Best Banks for Personal Loan

Banks for Personal Loan : आम्ही वेगवेगळ्या बँकेतून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे याची सर्वांना माहिती दिलेली आहे विविध लेखाच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या बँकेतून कशाप्रकारे वैयक्तिक कर्ज मिळते याची माहिती दिलेली आहे आणि या सोबतच त्या बँकेचा व्याजदर त्याला लागणारे कागदपत्रे इत्यादी बद्दल सुद्धा सांगितलेले आहे.

बँकेच्या वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रोसेस आम्ही ऑनलाईन पद्धतीने कसं होतील या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून तुम्ही कर्ज कशा पद्धतीने घेऊ शकता हे सांगितले आहे या माध्यमातून आम्ही तुम्हाला कर्ज घ्याच असं सांगत नाही परंतु गरजेच्या वेळेला उपयोगी पडणार आणि वेळेवर मदत करणारा एकच ऑप्शन आपल्याकडे असतो तो म्हणजे बँकेचे कर्ज.

सावकारी कर्ज किंवा इतर फसवणुकीचे कर्ज घेण्यापेक्षा कोणत्यातरी बँकेमधून कर्ज घेतलेले अगदी सुरक्षित असते आणि त्यामुळे कोणत्या बँकेतून कशाप्रकारे तुम्हाला कर्ज घेता येईल याची माहिती आम्ही आमच्या लेखातून देत असतो आम्ही माहिती देण्याचा सर्व प्रयत्न करतो हे करत असताना कोणावरही कर्ज घेण्याची वेळ येऊ नये असे सुद्धा आम्हाला मनोमन वाटते परंतु जर गरजच पडली तर तुम्हाला सुरक्षित आणि वेळेवर कर्ज कसे घेता येईल याबद्दलच आम्ही सर्व माहिती देत असतो.

आज आपण पाहणार आहोत अशा पाच बँका ज्या बँकेचा व्याजदर कमी असून तुम्हाला कमीत कमी पगार असला किंवा तुम्ही साधे व्यावसायिक जरी असलात तरी तुम्हाला त्या बँका मार्फत वैयक्तिक कर्ज सहजरीत्या उपलब्ध होते. खाली काही बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत आणि त्या बँकेमध्ये तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकता याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगितलेला आहे तर बघूया त्या कोणकोणत्या बँक आहेत ज्या बँकेमध्ये तुम्हाला सर्वात कमी वेळेत चांगल्या प्रकारे लोनची सुविधा दिली जाते.

1.महाराष्ट्र ग्रामीण बँक

महाराष्ट्र ग्रामीण बँक मार्फत कमीत कमी पगार असला तरी तुम्हाला चांगलं वैयक्तिक कर्ज दिले जाते या बँकेचा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 10 टक्के पासून पुढे सुरू होतो, कमीत कमी 6000 रुपये पगार असला तरी या बँकेमध्ये तुम्ही अर्ज करण्यास पात्र असू शकता. कमीत कमी तुमच्या अकाउंटला 6000 किंवा 6000 पेक्षा जास्त पगार दर महिना जमा होणे आवश्यक आहे तरच तुम्ही या बँकेमध्ये अर्ज करू शकता. कमीत कमी पगारांमध्ये आणि कमीत कमी व्याजदर वैयक्तिक कर्ज देणारी ही पहिली बँक आहे. (महाराष्ट्र ग्रामीण बँक चे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा)

2.बँक ऑफ महाराष्ट्र

राष्ट्रीयकृत बँकेमध्ये महाराष्ट्रातील नावाजलेले आणि एक नंबरच्या असणाऱ्या बँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कर्ज घेऊ शकता यामध्ये तुम्हाला कोणतेही तारण ठेवायची गरज पडत नाही आणि तुमचं उत्पन्न सुद्धा कमीत कमी असलं तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या अर्ज करू शकता या बँकेचे व्याजदर 10 टक्के एवढे लागते. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र बँक मार्फतच फक्त दहा टक्के पर्यंत व्याजावर वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळत. (बँक ऑफ महाराष्ट्र चे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा)

3. बँक ऑफ इंडिया (Banks for Personal Loan)

भारतातील दुसरी राष्ट्रीयकृत बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत सुद्धा तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज दिल्या जात वेगवेगळ्या योजनेमार्फत या कर्जाचा पुरवठा तुम्हाला केला जातो. त्यांचं व्याजदर सुद्धा भारतातील सर्वात कमी व्याजदर आहे 9.10% दर वर्षी एवढे व्याज हे बँक लावते आणि त्यानुसार तुम्हाला वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळत. (बँक ऑफ इंडियाचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा)

4. भारतीय स्टेट बँक

भारतीय स्टेट बँकेतून इन्स्टंट अति जलद गतीने लोन सुद्धा तुम्ही घेऊ शकतात या बँकेत सुद्धा वेगवेगळ्या चार प्रकारांतर्गत वैयक्तिक कर्जाचा पुरवठा केला जातो तुम्ही स्टेट बँकेचे युनो एप्लीकेशन युज करत असल तर फक्त चार स्टेप मध्ये तुम्हाला कर्ज मिळत कशा पद्धतीने कर्ज घ्यायचे यासाठी वेगळा लेख लिहिलेला आहे या बँकेचा व्याजदर 11. 05% दरवर्षी याप्रमाणे वैयक्तिक कर्जावर आकारला जातो. (भारतीय स्टेट बँकचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा)

5. टाटा कॅपिटल

खाजगी प्रकारात मोडणार वैयक्तिक कर्ज म्हणजे टाटा कॅपिटल, टाटा कॅपिटल मार्फत सुद्धा नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी फक्त चार सोप्या पद्धतीमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध आहे या बँकेचा व्याजदर 10.99 पासून चालू होत असून हे कर्ज तुम्ही 40 हजारापासून 35 लाखापर्यंत घेऊ शकता याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा येथे बघू शकता. (टाटा कॅपिटलचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा)

वरील सर्व कर्जाकरिता आणि त्याचा व्याजदर हा तुमच्या उत्पन्नावर तुमच्या सिबिल स्कोर वर अवलंबून असून तुमची पात्रता तपासण्यासाठी प्रत्येक कर्जाच्या शेवटी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे पात्रता तपासून कर्जासाठी अर्ज करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा