BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation Recruitment) मध्ये विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, तर ऑफलाईन अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 12000 हजार ते 175000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ही भरती एकूण 27 रिक्त जागांसाठी होणार आहे. उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज डिस्पॅच विभाग, जी-बिल्डिंग, टी. एन. मेडिकलचा तळमजला कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये स्टाफ नर्स,शिपाई, सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, बालरोग सल्लागार (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळ ग्रेड I ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट,विशेष शिक्षक ग्रेड I, विशेष शिक्षक ग्रेड II, ऑर्थोपेडिक्स सल्लागार (अंशवेळ), दंत तंत्रज्ञ, भूलतज्ज्ञ (अंशवेळ), व्यावसायिक समुपदेशक (अंशवेळ),

तसेच पूर्णवेळ ग्रेड II ऑडिओलॉजिस्ट,स्पीच थेरपिस्ट तसेच वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, विश्लेषक, संवाद विशेषज्ञ इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी अर्ज 15 डिसेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.Brihanmumbai Municipal Corporation उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता देखील पदानुसार वेगवेगळी असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता 10 वी पास ते पदवीधर पर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून तसेच दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे (Brihanmumbai Municipal Corporation Recruitment) राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा