Hindustan Shipyard Bharti

Hindustan Shipyard Bharti : हिंदुस्तान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 99 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 40 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावे. एससी/एसटी/ओबीसी उमेदवारांना 03 ते 05 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती मध्ये जनरल/ओबीसी साठी 300 रुपये तर एससी/एसटी आणि पीएच साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असल्यास अर्ज पदानुसार 24 डिसेंबर, 5 जानेवारी व 15 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण विशाखापट्टणम असणार आहे, ही भरती प्रक्रिया मॅनेजर,डेप्युटी मॅनेजर,मुख्य प्रोजेक्ट अधिक्षक,प्रोजेक्ट अधिक्षक,डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर,मेडिकल ऑफिसर,असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर,सिनिअर कन्सल्टंट,कन्सल्टंट इत्यादी पदांकरिता होणार असून सविस्तर पदसंख्येसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.hindustan shipyard

ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Hindustan Shipyard Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा